माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वतीने हॉलीक्रॉस हॉस्पिटल येथे PPE किट व साहित्य वाटप संपन्न

रोटरी क्लब ऑफ मुंबई, सीलँड फाउंडेशनच्या सहकार्याने केले होते आयोजन

कल्याण : कोरोना प्रदूर्भावाच्या काळात गेली ५- ६ महिने अविरतपणे कार्यरत राहून सेवा करणाऱ्या हॉस्पिटल, कल्याण पश्चिममधील डॉक्टर, नर्स व इतर कोरोना योद्धे यांना पीपीई किट व इतर सुरक्षेचे साहित्य वाटप करण्यात आले.  रोटरी क्लब ऑफ मुंबई, सीलँड फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने व माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या वतीने व रोटरी क्लबचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
कोरोना रोखण्यासाठी अनेक आघाड्यांवर काम सुरू आहे मात्र आपला जीव धोक्यात घालून सेवा देणारे डॉक्टर आणि कोरोना योद्धे अतिशय धाडसी काम करत आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी या साहित्याचे वाटप केले आहे असे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
हे साहित्य रोटरी क्लब ऑफ मुंबई सीलँड फाउंडेशनचे नरेंद्र पोद्दार व बदलापूरचे राम पातकर यांनी उपलब्ध करून दिले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडचे अध्यक्ष अजय सिंग, सचिव संजय पैठणकर, खजिनदार तुषार जैन, संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब एरंडे, बिजुल लाड, सचिन पितांबरे, डॉ. जितेंद्र बोबडे, अरुण पाटील, राजेश चासकर, प्रताप टूमकर, तुषार मोरे, अशोक शिंदे आदी पदाधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.

 466 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.